एमपीएससी परीक्षा माहिती | MPSC Exam Information in Marathi | MPSC Pariksha chi Mahiti

MPSC Exam Information in Marathi

नमस्कार मिञांनो आज आपण एमपीएससी (MPSC) म्हणजे काय तसेच तसेच एमपीएससी ( MPSC ) मार्फत कोणत्या परिक्षा होतात तसेच एमपीएससी ( MPSC ) परिक्षा देण्यासाठी शैक्षणिक पाञता तसेच इतर पाञता काय आहे ते पण पाहणार आहोत.

एमपीएससी म्हणजे काय | MPSC Full Form Marathi | महाराष्ट्र लोकसेवा आयोग माहिती

एमपीएससी (MPSC) म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग किंवा इंग्रजीत MPSC -  Maharashtra Public service Commission असा होतो. 
महाराष्ट्र लोकसेवा आयोग ही संस्था महाराष्ट्र शासनाची संस्था आहे आणि या संस्थेद्वारे महाराष्ट्र शासनाच्या विविध शासकीय विभागातील वर्ग-1, वर्ग-2, वर्ग-3 ची पदे परीक्षा भरली जातात. तसेच या पदांच्या भरतीसाठी परिक्षा घेण्याचे तसेच अभ्यासक्रम बनविण्याचे आणि विद्यार्थ्यांची निवड करण्याचे काम केले.

2021 पासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा परीक्षेमध्ये UPSC परीक्षे सारखी प्रयत्नांची मर्यादा आणली आहे. प्रत्येक कॅटेगरीचे परीक्षा देण्याचे प्रयत्न खालीलप्रमाणे 

सामान्य गट  (OPEN )
सामान्य गटातील विद्यार्थी कमीत कमी 19 आणि जास्तीत जास्त 39 वयापर्यंत परीक्षा देऊ शकतात व सामान्य गट विद्यार्थ्यंना 6 (सहा) वेळा परीक्षा देता येईल. 

इतर मागासवर्गीय गट  (OBC )
इतर मागासवर्गीय गटातील विद्यार्थी कमीत कमी 19 आणि जास्तीत जास्त 41 वयापर्यंत परीक्षा देऊ शकतात व इतर मागासवर्गीय गटातील विद्यार्थ्यंना 9 (नऊ) वेळा परीक्षा देता येईल. 

अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती (SC/ST )
अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती गटातील विद्यार्थी कमीत कमी 19 आणि जास्तीत जास्त 45 वयापर्यंत परीक्षा देऊ शकतात व अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती गटातील विद्यार्थ्यंना परीक्षा देण्याची मर्यादा नाही ते 45 वयापर्यंत किती पण वेळा परीक्षा देऊ शकतात.

एमपीएससी मार्फत खालील परिक्षा घेतल्या जातात | MPSC Post List in Marathi
1. राज्यसेवा 
2. पोलिस उपनिरीक्षक/विक्रीकर निरीक्षक/सहाय्यक कक्ष अधिकारी ( PSI/STI/ASO)
3. सहाय्यक मोटार वाहन अधिकारी (AMVI) 
4. टंकलेखक / लिपीक

आता पाहुया या परिक्षेतील पदांची थोडक्यात माहिती आणि पाञता

1. राज्यसेवा - ही परिक्षा महाराष्ट्र शासनाच्या वर्ग-1 आणि वर्ग-2 च्या पदाची भरती करण्यासाठी घेतली जाते यामधे खालील पदांचा समावेश होतो.

गट- अ किंवा वर्ग-1 ची पदे
1. उपजिल्हा अधिकारी ( Deputy Collector )
2. पोलिस उपअधिक्षक ( Deputy Superintendent of Police DySP/ACP )
3. सहाय्यक कमिशनर विक्रीकर ( Assistant Commissioner Sales Tax )
4. उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( Deputy Chief Executive Officer )
5. उपरजिस्टार सहकारी सोसायटी ( Sub Registrar Cooperative Societies )
6. अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग ( Superintendent State Excise Department )
7. गटविकास अधिकारी ( BDO - Block Development Officer )
8. मुख्यधिकारी - नगरपालिका आणि नगरपरिषद 
9. वित्त,लेखापरिक्षा, खाते अधिकारी 
10. तहसिलदार

गट-ब
1.गटविकास अधिकारी ( BDO - Block Development Officer )
2.मुख्यअधिकारी - नगरपालिका नगरपरिषद
3.मंञालय सेक्शन अधिकारी 
4.उपरजिस्टार सहकारी सोसायटी ( Sub Registrar Cooperative Societies )
5. भूमी अभिलेख तालुका निरीक्षक ( Taluka Inspector of Land Records )
6.उपअधिक्षक राज्य उत्पादन शुल्क ( Deputy Superintendent State Excise Dept )
7.वित्त,लेखापरिक्षा, खाते अधिकारी 
8.नायब तहसिलदार

शैक्षणिक पाञता - 
कोणत्याही शाखेची पदवी ( मुक्त विधापीठाची पण चालते ) शेवटच्या वर्षाला असलेले विद्यार्थी पण ही परिक्षा देऊ शकतात पण मुख्य परिक्षेच्या आधी त्यांचा शेवटच्या वर्षाचा निकाल लागला पाहिजे.

वयोमर्यादा - 
खुला गट - 18 ते 38
राखीव गट - 18 ते 43

परिक्षेचे स्वरूप -
मुख्य परिक्षा - 200 गुण ( 2 तास )
पुर्व परिक्षा - 800 गुण ( 8 पेपर )

2. पोलिस उपनिरीक्षक/विक्रीकर निरीक्षक/सहाय्यक कक्ष अधिकारी ( PSI/STI/ASO)

A. पोलिस उपनिरीक्षक ( PSI - POLICE SUB INSPECTOR ) - या पदाची आणि परिक्षेची माहिती खालील प्रमाणे

शैक्षणिक पाञता - 
कोणत्याही शाखेची पदवी ( मुक्त विधापीठाची पण चालते ) शेवटच्या वर्षाला असलेले विद्यार्थी पण ही परिक्षा देऊ शकतात पण मुख्य परिक्षेच्या आधी त्यांचा शेवटच्या वर्षाचा निकाल लागला पाहिजे.

वयोमर्यादा - 
खुला गट - 18 ते 38
राखीव गट - 18 ते 43

परिक्षेचे स्वरूप - 
1.पुर्व परिक्षा - 100 मार्क / 100 प्रश्न ( 1 तास )
2.मुख्य परिक्षा - 200 मार्क ( पेपर - 1 आणि पेपर -2 / प्रत्येकी एक तास )
3.मैदानी चाचणी - 
पुरूषांसाठी
गोळाफेक ( गोळा 7.260 किलो ग्रॅ ) - 15 मार्क
पुलअप्स - 20 मार्क 
लांबउडी - 15 मार्क
धावणे ( 800 मीटर ) - 50 मार्क
महिलांसाठी
गोळाफेक ( गोळा 4 किलो ग्रॅ ) - 20 मार्क
धावणे ( 200 मीटर ) - 40 मार्क 
चालणे ( 3 कि मी ) - 40 मार्क
4.मुलाखत - 40 मार्क ( ज्यांना शारिरीक परिक्षेत 50 पेक्षा जास्त मार्क असतील तेच उमेदवार मलाखतीसाठी पाञ आहेत )

B. विक्रीकर निरीक्षक ( STI - SALE TAX INSPECTOR ) - या पदाची आणि परिक्षेची माहिती खालील प्रमाणे

शैक्षणिक पाञता - 
कोणत्याही शाखेची पदवी ( मुक्त विधापीठाची पण चालते ) शेवटच्या वर्षाला असलेले विद्यार्थी पण ही परिक्षा देऊ शकतात पण मुख्य परिक्षेच्या आधी त्यांचा शेवटच्या वर्षाचा निकाल लागला पाहिजे.

वयोमर्यादा - 
खुला गट - 18 ते 38
राखीव गट - 18 ते 43

परिक्षेचे स्वरूप - 
1.पुर्व परिक्षा - 100 मार्क / 100 प्रश्न ( 1 तास )
2.मुख्य परिक्षा - 200 मार्क ( पेपर - 1 आणि पेपर -2 / प्रत्येकी एक तास )

या परिक्षेसाठी मुलाखत नाही अंतिम निवड ही मुख्य परिक्षेच्या गुणावरून केली जाते.

C. सहायक कक्ष अधिकारी ( ASO/ASST - ASSISTANT SECTION OFFICER ) | ASST full form in MPSC

ASST म्हणजे ASSISTANT/सहायक म्हणजेच सहायक कक्ष अधिकारी यालाच शॉर्टफॉर्म मध्ये ASST म्हणतात.

शैक्षणिक पाञता - 
कोणत्याही शाखेची पदवी ( मुक्त विधापीठाची पण चालते ) शेवटच्या वर्षाला असलेले विद्यार्थी पण ही परिक्षा देऊ शकतात पण मुख्य परिक्षेच्या आधी त्यांचा शेवटच्या वर्षाचा निकाल लागला पाहिजे.

वयोमर्यादा - 
खुला गट - 18 ते 38
राखीव गट - 18 ते 43

परिक्षेचे स्वरूप - 
1.पुर्व परिक्षा - 100 मार्क / 100 प्रश्न ( 1 तास )
2.मुख्य परिक्षा - 200 मार्क ( पेपर - 1 आणि पेपर -2 / प्रत्येकी एक तास )

या परिक्षेसाठी मलाखत नाही अंतिम निवड ही मुख्य परिक्षेच्या गुणावरून केली जाते.

3. सहाय्यक मोटार वाहन अधिकारी ( AMVI - Assistant Motor Vehicle Inspector ) - या पदासाठीची पाञता खालील प्रमाणे.

शैक्षणिक पाञता - 
डिप्लोमा किंवा डिग्री 
शाखा - मेकॅनिकल, ऑटोमोबाईल आणि प्रोडाॅक्शन
डिग्री किंवा डिप्लोमाच्या शेवटच्या वर्षाला असलेले विद्यार्थी पण ही परिक्षा देऊ शकतात पण मुख्य परिक्षेच्या आधी त्यांचा शेवटच्या वर्षाचा निकाल लागला पाहिजे.

इतर पाञता - 
उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी आसावा
त्याला मराठी भाषा लिहीता, वाचता आणि बोलता आली पाहिजे
दोनचाकी गिअर असलेल्या (MCWG) दुचाकीचे  व चारचाकी ( LMV ) चे लायसन आवश्यक.
( मोपेड किंवा स्कुटीचे लायसन चालत नाही )

वयोमर्यादा -
खुला गट - 19 ते 38
राखीव गट - 19 ते 43

शारिरीक पाञता -
पुरूषांसाठी 
उंची - 163 सेमी ( आनवाणी )
छाती न फुगवता - 79 से मी व फुगवुन 84 ( छाती 5 सेमी फुगली पाहिजे )
महिला
उंची - 155 सेमी ( आनवानी )
वजन - 45 कि लो कमीत कमी

चष्मा असलेले उमेदवार ही परिक्षा देऊ शकतात
रंगाधळेपणा आणि अंपग ऊमेदवार अपाञ आहेत

परिक्षेचे स्वरूप - 
पुर्व परिक्षा - 100 मार्क / 100 प्रश्न ( 1 तास )
मुख्य परिक्षा - 300 मार्क

या परिक्षेसाठी मलाखत नाही अंतिम निवड ही मुख्य परिक्षेच्या गुणावरून केली जाते.

4. टंकलेखक / लिपीक - या पदासाठीची पाञता खालीलप्रमाणे

शैक्षणिक - 
कोणत्याही शाखेची पदवी ( मुक्त विधापीठाची पण चालते ) शेवटच्या वर्षाला असलेले विद्यार्थी पण ही परिक्षा देऊ शकतात पण मुख्य परिक्षेच्या आधी त्यांचा शेवटच्या वर्षाचा निकाल लागला पाहिजे.

इतर पाञता -
मराठी आणि इंग्रजी टायपिंक कोर्स पुर्ण आसावा
मराठी टायपिंगसाठी कमीत कमी 30 शब्द प्रतिमीनीट वेग हवा 
इंग्रजी टायपिंगसाठी कमीत कमी 40 शब्द प्रतिमीनीट वेग हवा 

वयोमर्यादा - 
खुला गट - 18 ते 33
राखीव गट - 18 ते 38 

परिक्षेचे स्वरूप -
पुर्व परिक्षा - 100 मार्क / 100 प्रश्न ( 1 तास )
मुख्य परिक्षा - 300 मार्क

या परिक्षेसाठी मलाखत नाही अंतिम निवड ही मुख्य परिक्षेच्या गुणावरून केली जाते.

इतर महत्वाची माहिती - 
Suraj Mane

नमस्कार मी महाराष्ट्र जाॅब पोर्टल चा संस्थापक / लेखक आहे. मी पुणे इथे राहतो व माझे शिक्षण इंजिनीअरींग झाले आहे. माझी आवड सरकारी नोकरी, डिजीटल मार्केटींग मध्ये आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने